आजच्या डिजिटल युगात प्रत्येक घरात स्मार्टफोन पोहोचला आहे, पण त्याचबरोबर एक मोठी चिंता देखील शांतपणे वाढताना दिसतेय, ती म्हणजे लहान मुलांचे वाढते स्क्रीन अॅडिक्शन. कार्टून, रील्स, गेम्स आणि सतत बदलणाऱ्या चमकदार स्क्रीनमुळे मुलांची कल्पनाशक्ती, एकाग्रता आणि कुटुंबासोबतचा संवाद कमी होत चालला आहे. अशा काळात GetExtra.in हे फक्त एक अॅप किंवा स्टार्टअप नसून भारतीय संस्कृती, प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक डिजिटल मनोरंजन यांना नव्याने जिवंत करणारे एक आधुनिक व्यासपीठ म्हणून समोर येत आहे. महाराष्ट्रातील एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुण उद्योजकाने सुरू केलेला हा उपक्रम मुलांना आणि कुटुंबांना “स्क्रीनवरून कानांकडे” घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. GetExtra वर इतिहास, संतचरित्रे, देशभक्ती, पुराणकथा, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या गोष्टी, नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या कथा आणि मनोरंजन यांचे ऑडिओ स्वरूपात सादरीकरण केले जाते, ज्यामुळे मुलं मोबाईलकडे फक्त बघत नाहीत तर ऐकत ऐकत विचार करायला, कल्पना करायला आणि शिकायला लागतात. हे प्लॅटफॉर्म विशेषतः त्या पालकांसाठी आशेचा किरण ठरत आहे जे आपल्या मुलांना पू...